Ameya

Thursday, 12 September 2019


हिंगोलीचे प्रासादिक दत्त मंदिर

हिंगोली दत्त मंदिरातील प्रासादिक मूर्ती
हिंगोली दत्त मंदिरातील प्रासादिक मूर्ती 
हे दत्त मंदिर एका विशिष्ट कथेने प्रसिद्ध व प्रासादिक ठरले आहे. एकदा श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे बंधु श्री प. पु. सीताराम महाराज हिंगोली मुक्कामी होते. त्यांचे शिष्य हिंगोली येथील दानशूर श्री हेमराजजी मूंदडा हे मरणासन्न अवस्थेत होते. जीविताची अशा मावळू लागली होती. त्या वेळेस त्यांनी श्री स्वामी समोर नम्र होऊन इच्छा व्यक्त केली मला दत्त सेवा करायची. लगेच महाराजानी आशीर्वाद दिला श्री प. पु. सिताराम महाराज यांनी स्वतः चे सोळा वर्ष आयुष्य त्यांना देऊन महाराज श्री क्षेत्र बडनेरा (झीरी) येथे समाधीस्थ झाले. तद्नंतर श्री हेमराज़जी मुंदडा यांनी त्या काळात सव्वा लक्ष रुपये खर्चून सुंदर वास्तू श्री दत्त मंदिर बांधलें, आणि उरलेलें सोळा वर्ष आयुष्य सेवेत घालवले. तेंव्हा पासून आजपर्यंत त्यांच्या वारसांनी वर्षातील श्री दत्त जयंती, प. पु. सीताराम महाराज पुण्यतिथी, श्री प. प. वासुदेवानंद पुण्यतिथी हि या ठिकाणी होत आहे. या मंदिरातली प्रसन्न मूर्ती पहिली कि दत्तभक्त देहभान विसरून जातात. आपणही जरूर आशीर्वाद घ्यावा.
। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।

हिंगोली दत्त मंदिर
हिंगोली दत्त मंदिर

No comments: