Ameya

Tuesday 29 September 2020

Vindhyavasini

 Kat

बारा शक्तिपीठांचे अंशपीठ श्री देवी विंध्यवासिनी

बारा शक्तिपीठांचे अंशपीठ श्री देवी विंध्यवासिनी

परशुराम भूमीला देवभूमी असेही म्हणतात ते खरे आहे. कारण कोकणातील प्रत्येक गावात ग्रामदेवता आहे. तर गावातील वाडीमध्ये एखादे मंदिरदेखील आहे.

vindyavasiniपरशुराम भूमीला देवभूमी असेही म्हणतात ते खरे आहे. कारण कोकणातील प्रत्येक गावात ग्रामदेवता आहे. तर गावातील वाडीमध्ये एखादे मंदिरदेखील आहे. त्यामुळे देवभूमी हे नाव उचित ठरते. चिपळूण शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत अवघ्या दोन कि.मी. अंतरावर श्री विंध्यवासिनी देवस्थान आह़े पुराणकाळापासून या तीर्थस्थानाला महत्त्व असून ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आह़े नवरात्रोत्सवात याठिकाणी देवीची यात्रा भरते. यानिमित्ताने मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अनेक घराण्यांची ही कुलस्वामिनी आहे.

भारतातील बारा शक्तिपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्य पीठ उत्तर प्रदेशात विंध्याचल येथे आहे. तिचे अंशपीठ रावतळे-चिपळूण येथील विंध्यवासिनी आहे. पौराणिक कथेनुसार आदिशक्ती योगमायेने यशोदेच्या उदरी जन्म घेतला. इकडे वसुदेवाने श्रीकृष्णाला कंस भयाने यशोदेजवळ आणून ठेवले. वसुदेव-देवकीचे अपत्य समजून तिला कंसाने शिळेवर आपटण्यासाठी उचलले. त्याचक्षणी ती कंसाच्या हातातून निसटली व अंतराळात गेली. आणि विंध्याचल येथे प्रकटली. तीच विंध्यवासिनी देवी होय. विंध्य पर्वतावर नित्यवास करणारी पार्वती असाही अर्थ सांगितला जातो.

इ.स. आठच्या सुमारास चालुक्य घराण्यातील सम्राट पहिला पुलकेशी याने चिपळूणनगरीत यज्ञ केला. या पुलकेशीची माता शिलाहार राजघराण्यातील होती. तिने आपल्या माहेरी हा यज्ञ घडविला. त्याच काळात सध्याची विंध्यवासिनीची मूर्ती तिने दक्षिण भारतातून आणली असावी असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. म्हणूनच चिपळूण क्षेत्र परशुराम क्षेत्राप्रमाणेच यज्ञक्षेत्र आहे.

या मंदिरातील विंध्यवासिनी देवीची शाळीग्राम मूर्ती आहे. अष्टभूजा विंध्यवासिनीची मूर्ती घोटीव, देखणी व सुबक आहे. हे होयसळ शिल्प इ.स. १००० ते १२००च्या दरम्यानचे असावे. या मूर्तीच्या डाव्या हातात नाग, दुस-या हातात धनुष्य, तिस-या हातात ढाल, चौथ्या हातात रेडारूपी महिषासुराचे मस्तक धरले आहे. तर उजवीकडील एका हातात तलवार, दुस-या हाती चाप, तिस-या हाती बाण व चौथ्या हातात शस्त्राने महिषासुराच्या मस्तकावर आघात केला आहे. मूर्तीच्या मस्तकावर छोटे शिवलिंग आहे व उभ्या गणेशाची मूर्ती आहे. तर शस्त्राघातामुळे रेडय़ाचे मस्तक धडावेगळे होऊन खाली पडले आहे व रेडय़ाच्या पार्श्वभागावर देवीचे वाहन असलेल्या वाघाने हल्ला केला आहे. अशी ही शिल्पाकृती आहे. आदिलशाही काळात चिपळूण व कोकण प्रांतावर बाराराव कोळ्यांचे राज्य होते. हे ‘राव’ ज्या भागात राहायचे तेच रावतळे होय. या कोळ्यांचा पाडाव करण्यासाठी शेख बहाद्दूर चिपळूणवर चालून आला. रावतळ्याच्या वेशीवर युद्ध झाले. जर यामध्ये कोळ्यांचा पराभव झाला तर शत्रू आपली कुलदेवता भ्रष्ट करेल या भीतीने कोळ्यांनी श्री विंध्यवासिनी देवीच्या मंदिरावर दगड रचले व डोंगरातील मातीखाली मंदिर गाडून टाकले. मात्र, शेख बहाद्दूर कोळ्यांकडून ठार झाला. परंतु श्री विंध्यवासिनी देवीचे मंदिर त्याच स्थितीत अनेक वर्षे राहिले. त्यामध्ये मूर्तीचे दोन हात खंडित झाले. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात शेत नांगरताना देवीचा कळस दिसला आणि नंतर हे मंदिर प्रकाशात आले. देवीची मूर्ती भुयारात होती. अंधा-या गाभा-यात एकावेळी एकच माणूस दर्शन घेईल एवढीच जागा होती. त्यानंतर १९८३च्या सुमारास या मंदिरावर दरड कोसळली. त्यानंतर विंध्यवासिनी देवस्थान ट्रस्टतर्फे जीर्णोद्धार करण्यात आला. १ फेब्रुवारी १९८८ रोजी या कामाला प्रारंभ झाला व १९९२ मध्ये मंदिरावर कळसही चढविण्यात आला. मंदिराच्या पाय-या चढून जाताना डावीकडे अगस्ती कुंड आहे. यामध्ये बाराही महिने झरा आहे. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूला असणारे धबधबे पावसाळ्यात मंदिराची शोभा वाढवितात. मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होतो. देवीचा जन्मोत्सव चैत्र शुद्ध द्वादशी ते चैत्र वद्य प्रतिपदा या काळात साजरा होतो. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमा व नवरात्रोत्सवात मोठी गर्दी होते.

छत्रपती शिवराय, समर्थ रामदास स्वामी आणि भगवान परशुराम यांनी श्री विंध्यवासिनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती इतिहासात मिळते. देवीची पाषाणमूर्ती प्रसन्न असून शेजारी कार्तिकस्वामींची आणि गणपतीची मूर्ती आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात कार्तिकस्वामींची दुर्मीळ अशी षण्मुखी मूर्ती या मंदिरात आह़े नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आह़े िवध्यवासिनी देवी अनेकांची कुलस्वामिनीही आहे. नवरात्रोत्सवात येथे नऊ दिवस देवीची यात्रा भरते. देवीचा जागर होतो.

बारा शक्तिपीठांचे अंशपीठ म्हणून चिपळूण शहरातील श्री देवी विंध्यवासिनी प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. चिपळूण मध्यवर्ती एस.टी. स्थानकातून नवरात्रोत्सवात तासाला एस.टी.च्या मिनीबस सोडण्यात येत आहेत. तर चिपळूण शहरातून रिक्षाने या मंदिराकडे सहज जाता येते. नवरात्रोत्सवात महाराष्ट्रातून अनेक भक्त दर्शनाला येतात.

   
   
whatsapp

Vindhyavasini

 Vin

Monday, 22 October 2012

Vindhyavasini Devi - Chiplun

विंध्यवासिनी  देवी -  चिपळूण




                          नंद आणि यशोदेची मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव आणि देवकीच्या कोठडीत पोहोचली , तिला कंसाने ठार मारण्यासाठी उचलले तेव्हा ती त्याच्या हातातून निसटली आणि विंध्य पर्वतावर जाऊन राहिले तीच हि  विंध्यवासिनी  देवी .
                            १९८३ साली झालेल्या पावसात या मुल मंदिराचे मोठे नुकसान झाले , आता त्याचा जीर्नोद्धार झालेला आहे .. १५-२० उभ्या पायऱ्या चढून गेलो कि आपण सभामंडपात पोहोचतो . देवीची मूर्ती होयसाळ शैलीची  असून ती ८०० ते १००० वर्षे  जुनी असावी . मूर्तीला ८ हात असून ते महिषासुर रुपात आहे . या अष्टभूजांमध्ये  विविध आयुधे आहेत. पायाखाली रेड्याला दाबून धरले आहे . रेड्याचे शीर धडावेगळे होऊन पडलेले आहे . शेजारीच सहा तोंडाच्या कार्तीकेयाचीही सुंदर मूर्ती आहे . स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन घेत नाहीत म्हणून ती झाकून ठेवलेली आहे . दोन्ही शिल्पे अत्यंत उत्कृष्ट असून त्यावरील कोरीव काम , सुबकता , काळ्या पाषाणाची चकाकी यामुळे कलाकारां बद्दलचा आपला आदर द्विगुणीत होतो.   

No comments:

Post a comment