Ameya

Tuesday 24 September 2019

Bavanshloki guru charitra




Tuesday, February 26, 2019


बावन्नश्लोकी गुरुचरित्र

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
             *बावन्नश्लोकी गुरुचरित्र*

*श्रीगणेशाय नमः ।* *श्रीमद्दत्तात्रैयगुरुवे नमः ।*
*अथ ध्यानम्*
*दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं* *त्रिशूलं डमरुं गदांच । पद्मासन्स्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥*

*काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥*
*कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥*

*ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा  ।जयजयाजी लंबोदरा । शकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥*

*त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरी वास करुनी ओजा ।सद्भक्त तेथे करिती आनंदा । त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥*

*जयजयाजी सिद्धमुनी ।  तूं तारक भवार्णावांतुनी । संदेह होता माझे मनी । आजि तुवां कुडें केले ॥ ३ ॥*

*ऐशी शिष्याची विनंती । ऐकुनि सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणी ॥ ४ ॥*

*भक्तजनरक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सागरपुत्रांकारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळी ॥ ५ ॥*

*तीर्थे असली अपार परी । समस्त सांडुनि प्रीति करी । कैसा पावला श्रीदत्ताची ।  श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥*

*ज्यावरी असे श्रीगुरुची प्रीति ।तीर्थमहिमा ऐकावया चित्ती ।वांच्छा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति यतिराया॥ ७ ॥*

*गोकर्णक्षेत्री श्रीपादयती । राहिले तीन वर्षे गुप्ती । तेथूनी गुरु गीरीपुरा येती ।  लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥*

*श्रीपाद कुरवपुरी असतां । पुढें वर्तली कैसी कथा । विस्तारुनी सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥*

*सिद्ध म्हणे नामधारकासी ।श्रीगुरु महिमा काय पुससी ।अनंतरुपे परियेसी ।  विश्र्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥*

*सिद्ध म्हणे ऐक वत्सा ।अवतार झाला श्रीपादहर्षा । पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥ ११ ॥*

*श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हा ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरवंसा जिविताचा ॥ १२ ॥*

*श्रीगुरुचरित्र कथामृत ।  सेवितां वांच्छा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥*

*ऐकुनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरु चरित्र कामधेनू जाण । सांगता झाला विस्तारे ॥ १४ ॥*

*ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । लीन झाली परियेसी ॥ १५ ॥*

*विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत । सांगा स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥*

*ऐक शिष्या नामकरणी । श्रीगुरुभक्त शिखामणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । लीन झाली निर्धारे ॥ १७ ॥*

*ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नोव्हें अंतःकरणी । कथामृत संजिवनी । आणिक निरोपावी दातारा ॥ १८ ॥*

*अज्ञान तिमिर रजनीत । निजलो होतो मदोन्मत्त । श्रीगुरुचरित्र वचनामृत । प्राशन केले दातारा ॥ १९ ॥*

*स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरी असती जाण ॥ २० ॥*

*सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका ।  उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेत जननीसी ॥ २१ ॥*

*तुझा चरणसंपर्क होता । झाले ज्ञान मज आतां । परमार्थी मन ऐकता । झाले तुझे प्रसादें ॥ २२ ॥*

*लोटांगणे श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्तिसी । नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥ २३ ॥*

*शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी । ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥*

*सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला । सांगता न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥ २५ ॥*

*श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमुरे युक्तिसी । वेदांत न कळे ब्रह्मयासी ।  अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥*

*चतुर्वेद विस्तारेसी । श्रीगुरु सांगती विप्रासी । पुढे कथा वर्तली कैसी ।  विस्ताराची दातारा ॥ २७ ॥*

*नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । उल्हास होतो मानसी ।  श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥*

*पुढे कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्री । निरुपावे विस्तारी ।  सिद्धमुनी कृपासिंधु ॥ २९ ॥*

*श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्ही पाजिला आम्हांस । परी तृप्त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥*

*सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झाले ऐका । योगेश्र्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥*

*पतिव्रतेची रीती । सांगे देवासी बृहस्पती । सहगमनाची फलश्रुती । येणेपरी निरुपिली ॥ ३२ ॥*

*श्रीगुरु आले मठासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारुनि आम्हांसी ।  निरुपावें स्वामिया ॥ ३३ ॥*

*श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषी । तया काश्मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥ ३४ ॥*

*पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारुनि सांगा वहिली । मति माझी असे वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥*

*गांणगापुरी असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु । सांगता नये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥ ३६ ॥*

*ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजना कल्पतरु । सांगता झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥ ३७ ॥*

*आर्त झालो मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्रभाग सांगे श्रीगुरुचा ।  माझे मन निववी वेगी ॥ ३८ ॥*

*सिद्ध म्हणे नामधारका ।  अपूर्व झाले ऐका । साठ वर्षे वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥*

*सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका । वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥*

*जयजयाजी सिद्धमुनी । तू तारक या भवार्णवांतुनी । नानाधर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिले ॥ ४१ ॥*

*मागें कथानक निरुपिले । सायंदेव शिष्य भले । श्रीगुरुंनी त्यांसी निरुपिलें । कलत्र पुत्र आणि म्हणती ॥ ४२ ॥*

*श्रीगुरु म्हणती द्विजासी ।  या अनंत व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वी बहुती आराधिले ॥ ४३ ॥*

*श्रीगुरु माझा मलिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरु भुवन । आपण नये आतां येथून । सोडून चरण श्रीगुरुचे ॥ ४४ ॥*

*तू भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधले सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥*

*गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याती झाली अपारु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥*

*सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र । ऐसे हें गुरुचरित्र । तत्परतेसी परियेसी ॥ ४७ ॥*

*श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी । मार्गांत शूद्र परियेसी । शेती आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥*

*त्रिमूर्तीचा अवतार । वेषधारी झाला नर । राहिले प्रीती गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनिया ॥ ४९ ॥*

*तेणे मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाला त्यासी गुरुवर ।  दिधला वर परियेसा ॥ ५० ॥*

*राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनी । योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावे म्हणूनिया ॥ ५१ ॥*

*म्हणे सरस्वती गंगाधर ।  श्रोतया करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट लाधेल ॥ ५२ ॥*

*॥ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्र्लोकात्मकं  गुरुचरित्र संपूर्णम् ॥*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

No comments:


Post a Comment

im writing under "Comment Form Message"




No comments: