Tuesday, February 26, 2019
बावन्नश्लोकी गुरुचरित्र
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*बावन्नश्लोकी गुरुचरित्र*
*श्रीगणेशाय नमः ।* *श्रीमद्दत्तात्रैयगुरुवे नमः ।*
*अथ ध्यानम्*
*दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं* *त्रिशूलं डमरुं गदांच । पद्मासन्स्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥*
*काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥*
*कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥*
*ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा ।जयजयाजी लंबोदरा । शकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥*
*त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरी वास करुनी ओजा ।सद्भक्त तेथे करिती आनंदा । त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥*
*जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णावांतुनी । संदेह होता माझे मनी । आजि तुवां कुडें केले ॥ ३ ॥*
*ऐशी शिष्याची विनंती । ऐकुनि सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणी ॥ ४ ॥*
*भक्तजनरक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सागरपुत्रांकारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळी ॥ ५ ॥*
*तीर्थे असली अपार परी । समस्त सांडुनि प्रीति करी । कैसा पावला श्रीदत्ताची । श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥*
*ज्यावरी असे श्रीगुरुची प्रीति ।तीर्थमहिमा ऐकावया चित्ती ।वांच्छा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति यतिराया॥ ७ ॥*
*गोकर्णक्षेत्री श्रीपादयती । राहिले तीन वर्षे गुप्ती । तेथूनी गुरु गीरीपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥*
*श्रीपाद कुरवपुरी असतां । पुढें वर्तली कैसी कथा । विस्तारुनी सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥*
*सिद्ध म्हणे नामधारकासी ।श्रीगुरु महिमा काय पुससी ।अनंतरुपे परियेसी । विश्र्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥*
*सिद्ध म्हणे ऐक वत्सा ।अवतार झाला श्रीपादहर्षा । पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥ ११ ॥*
*श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हा ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरवंसा जिविताचा ॥ १२ ॥*
*श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांच्छा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥*
*ऐकुनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरु चरित्र कामधेनू जाण । सांगता झाला विस्तारे ॥ १४ ॥*
*ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । लीन झाली परियेसी ॥ १५ ॥*
*विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत । सांगा स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥*
*ऐक शिष्या नामकरणी । श्रीगुरुभक्त शिखामणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । लीन झाली निर्धारे ॥ १७ ॥*
*ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नोव्हें अंतःकरणी । कथामृत संजिवनी । आणिक निरोपावी दातारा ॥ १८ ॥*
*अज्ञान तिमिर रजनीत । निजलो होतो मदोन्मत्त । श्रीगुरुचरित्र वचनामृत । प्राशन केले दातारा ॥ १९ ॥*
*स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरी असती जाण ॥ २० ॥*
*सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेत जननीसी ॥ २१ ॥*
*तुझा चरणसंपर्क होता । झाले ज्ञान मज आतां । परमार्थी मन ऐकता । झाले तुझे प्रसादें ॥ २२ ॥*
*लोटांगणे श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्तिसी । नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥ २३ ॥*
*शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी । ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥*
*सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला । सांगता न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥ २५ ॥*
*श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमुरे युक्तिसी । वेदांत न कळे ब्रह्मयासी । अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥*
*चतुर्वेद विस्तारेसी । श्रीगुरु सांगती विप्रासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्ताराची दातारा ॥ २७ ॥*
*नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । उल्हास होतो मानसी । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥*
*पुढे कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्री । निरुपावे विस्तारी । सिद्धमुनी कृपासिंधु ॥ २९ ॥*
*श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्ही पाजिला आम्हांस । परी तृप्त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥*
*सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झाले ऐका । योगेश्र्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥*
*पतिव्रतेची रीती । सांगे देवासी बृहस्पती । सहगमनाची फलश्रुती । येणेपरी निरुपिली ॥ ३२ ॥*
*श्रीगुरु आले मठासी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥ ३३ ॥*
*श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषी । तया काश्मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥ ३४ ॥*
*पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारुनि सांगा वहिली । मति माझी असे वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥*
*गांणगापुरी असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु । सांगता नये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥ ३६ ॥*
*ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजना कल्पतरु । सांगता झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥ ३७ ॥*
*आर्त झालो मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्रभाग सांगे श्रीगुरुचा । माझे मन निववी वेगी ॥ ३८ ॥*
*सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व झाले ऐका । साठ वर्षे वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥*
*सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका । वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥*
*जयजयाजी सिद्धमुनी । तू तारक या भवार्णवांतुनी । नानाधर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिले ॥ ४१ ॥*
*मागें कथानक निरुपिले । सायंदेव शिष्य भले । श्रीगुरुंनी त्यांसी निरुपिलें । कलत्र पुत्र आणि म्हणती ॥ ४२ ॥*
*श्रीगुरु म्हणती द्विजासी । या अनंत व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वी बहुती आराधिले ॥ ४३ ॥*
*श्रीगुरु माझा मलिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरु भुवन । आपण नये आतां येथून । सोडून चरण श्रीगुरुचे ॥ ४४ ॥*
*तू भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधले सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥*
*गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याती झाली अपारु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥*
*सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र । ऐसे हें गुरुचरित्र । तत्परतेसी परियेसी ॥ ४७ ॥*
*श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी । मार्गांत शूद्र परियेसी । शेती आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥*
*त्रिमूर्तीचा अवतार । वेषधारी झाला नर । राहिले प्रीती गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनिया ॥ ४९ ॥*
*तेणे मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥ ५० ॥*
*राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनी । योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावे म्हणूनिया ॥ ५१ ॥*
*म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतया करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट लाधेल ॥ ५२ ॥*
*॥ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्र्लोकात्मकं गुरुचरित्र संपूर्णम् ॥*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
Subscribe to: Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"Links to this post
Create a Link