Ameya

Monday 21 February 2022

Jai gajanan

 जय गजानन 


श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,
"कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥"

जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, - "दंड गर्दन पिळदार। भव्य छाती दृष्टी स्थिर। भृकुटी ठायी झाली असे॥" जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या* अवस्थेत होते . (तुर्या* अवस्था : जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर। झाले असे पंढरपूर। लांबलांबूनीया दर्शनास येती। लोक ते पावती समाधान॥,"

बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. शेगांवात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्तीमार्गाला लावले.

सद्‌गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते. या संदर्भात असे सांगितले जाते की ज्या दिवशी तरूण वयातील गजानन महाराज श्री स्वामींना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते त्यादिवशी श्री स्वामी अतिशय आनंदात होते. तसेच दुरून गजानन महाराजांना (१७-१८ वर्षे वयाचे) येताना पाहून ते अतिशय आनंदाने उद्गारले, "गणपती आला रे!" त्यावर त्यांनी गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत केले. असे सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःजवळ ठेऊन घेतल्यानंतर श्री स्वामींनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले . त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले .
जेव्हा श्री गजानन महाराजांनी आपल्या अवतारसमाप्तीची वेळ ठरवली, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु श्री विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला
समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले,

"आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"

लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.

त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला,

"जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||,"

आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना

"अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!"

असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंका नाही.

त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.

०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.

देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, "मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका। कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच॥" "दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच। तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे॥." त्यामुळेच जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी आजही त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

श्री गजानन महाराज यांच्या विषयी काही विशेष

श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते (आहेत) आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात, असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. सर्व भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.

शरीरयष्टी ::--

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..

अन्नसेवन::--

महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.

महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन - चार दिवस उपाशी राहावे . भक्तांकडून येणारेपंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही सेवन करावे. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.

मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात . महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत,



१. महाराजांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रक टिपू न शकणे

त्यांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रक (कॅमेरा) टिपू शकला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रत्येक वेळी काढलेले त्यांचे छायाचित्र वेगळेच निघायचे; म्हणून महाराजांचे एकही छायाचित्र दुसर्‍या छायाचित्राशी जुळत नाही.



२. महाराजांचा द्रष्टेपणा !

प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला. त्यांच्या या शिकवणुकीची आवश्यकता आज भासतच आहे. संत किती द्रष्टे असतात ? याचीच ही प्रचीती आहे.

३. सर्व विषयांत पारंगत असणारे श्री गजानन महाराज !

महाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आदी भाषा अवगत होत्या, तसेच सर्व विषयांचे ज्ञानही होते. समोरच्या व्यक्तींची योग्यता ओळखून महाराज त्या व्यक्तीशी संभाषण करत असत. खरा जिज्ञासू समोर आल्यास त्याची जिज्ञासा त्यांच्याकडून शमवली जात असे. कला आणि संगीत यांचीही त्यांना आवड होती. ते विविध रागांत स्वतः भजने आणि पदे म्हणत असत. त्यांना गातांना पाहून खरा गायकही प्रभावित होत असे. त्यांचा वेद आणि ऋचा यांचाही दांडगा अभ्यास होता.

४. महाराजांच्या आवडत्या गोष्टी

भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे । चंदन, चावल, बेलकी पातियां शिवजीके माथे धरो रे ॥ हे संत मीराबाईचे पद महाराजांना फारच आवडायचे. हेच पद ते सतत म्हणायचे.
महाराजांना लाकडी पलंगावर बसायला फार आवडत असे; म्हणून शेगावी त्यांचा हा पलंग संस्थानाकडून भक्तांच्या दर्शनार्थ ठेवला आहे. गण गण गणांत बोते असे ते सतत गुणगुणायचे; म्हणूनही लोक त्यांना गजानन महाराज असे म्हणतात.

५. भक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणे

भक्तांच्या उद्धारासाठी त्यांची गावोगावी सारखी भ्रमंती चालूच असायची. कुणीही त्यांना आपल्या घरी थांबवून ठेवू शकत नसे.

६. महाराजांनी केलेले विविध चमत्कार !

त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनात अनेक चमत्कारांचा अनुभव अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे. दुखण्यातून बरे करणे, कोरड्या विहिरीला पाणी आणणे, कावळ्यांना पुन्हा न येण्यास सांगणे, आगगाडी रोखून धरणे, भक्तांना नर्मदा नदीचे दर्शन घडवणे, महारोग्याचा रोग बरा करणे, द्वाड गाय आणि घोडा यांना शांत करणे, भक्तांना विठ्ठलाचे अन् रामदास स्वामींचे दर्शन घडवणे, पितांबर या शिष्याचा उद्धार करणे, वाळलेल्या आंब्याच्या झाडास हिरवी पाने आणणे, जळत्या पलंगावर बसणे, मधमाशांनी चावा घेऊनही अंग सुरक्षित असणे, ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे गर्वहरण करणे, ऊसाच्या काठीचा मार सहन करणे, पहिलवानाला पाय उचलू न देणे, चिलीमसमोर नुसती काडी धरताच चिलीम पेटणे, असे चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत.

७. देश-विदेशातील भक्तांना महाराजांच्या कृपाशीर्वादाची अनुभूती देणारी विदर्भाची पंढरी !
श्री गजानन महाराजांच्या संदर्भात लक्षावधी लोक प्रतिदिन अनुभूती घेत असल्यानेच त्यांच्या दर्शनार्थ शेगावात भक्तांची मुग्यांसारखी गर्दी होत आहे. विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विदेशातही महाराजांचे भक्त त्यांच्या कृपावर्षावाचा नित्य अनुभव घेत आहेत. हीच खरी लीला ! त्यामुळे आजही शेगावचे गजानन महाराज मंदिर हे विदर्भाची पंढरी म्हणून गणले जाते. शेगावी जाताच श्री महाराजांच्या चरणी मस्तक विनम्र होते. गजानन महाराज की जय असा जयघोष करून लोक स्वतःला धन्य समजतात.

॥ गण गण गणांत बोते ॥

॥ जय गजानन ॥

Gajanan bawani

 

गजानन महाराज बावन्नी

श्री गजानन महाराज बावन्नी

।। जय जय सद्गुरू गजानना

रक्षक तुची भक्तजना ।।१।।

।। निर्गुण तू परमात्मा तू ।

सगुण रूपात गजानन तू ।।२।।

।।सदेह तू परि विदेह तू ।

देह असुनि देहातीत तू ।।३।।

।।माघ वद्य सप्तमी दिनी ।

शेगावात प्रगतोनी ।।४।।

।।उष्ट्या पत्रावळी निमित्त ।

विदेहत्व तव हो प्रगत ।।५।।

।। बंकट लालावरी तुझी ।

कृपा जाहली ती साची ।।६।।

।। गोसाव्याच्या नवसासाठी ।

गांजा घेसी लावुनी ओठी ।।७।।

।।तव पदतीर्थे वाचविला ।

जानराव तो भक्त भला ।।८।।

।।जनाकीरामा चिंचवणे ।

नासवुनी स्वरूपी आणणे ।।९।।

।मुकीन चंदुचे कानवले ।

खावूनी कृतार्थ त्या केले ।।१०।।

विहिरीमाजी जलविहिना ।

केले देवा जलभारणा ।।११।।

मधमाश्यांचे डंक तुवा ।

सहन सुखे केले देवा ।।१२।।

त्यांचे काटे योगबले ।

काढुनी सहजी दाखविले ।।१३।।

कुस्ती हरिशी खेळोनी ।

शक्ती दर्शन घडावोनी ।।१४।।

वेद म्हणूनी दाखविला ।

चकित द्रविड ब्राम्हण झाला ।।१५।।

जळत्या पर्यकावरती ।

ब्राम्ह्गीरीला ये प्रचिती ।।१६।।

टाकळीकर हरिदासाचा ।

अश्र्व शांत केला साचा ।।१७।।

बाळकृष्ण बाळापूरचा ।

समर्थ भक्तचि जो होता ।।१८।।

दामदासरूपे त्याला ।

दर्शन देवुनि तोषविला ।।१९।।

सुकलालाची गोमाता ।

द्वाड बहू होती ताता ।।२०।।

कृपा तुझी होतांच क्षणी ।

शांत जाहली ती जननी ।।२१।।

घुडे लक्ष्मण शेगांवी

येता व्याधी तू निरवी ।।२२।।

दांभिकता परि ती त्याची ।

तू न चलवुनि घे साची ।।२३।।

भास्कर पाटील तव भक्त ।

उद्धरलासी तू त्वरित ।।२४।।

आज्ञा तव शिरसा वंद्य ।

काकही मानती तुज वंद्य ।।२५।।

विहिरीमाजी रक्षियला ।

देवा तू गणु जवऱ्याला ।।२६।।

पीतांबराकरवी लीला ।

वठला आंबा पल्लविला ।।२७।।

सुबुद्धी देशी जोशाला ।

माफ करी तो दंडाला ।।२८।।

सबडद येथील गंगाभारती ।

थुंकूनी वारिली रक्तपिती ।।२९।।

पुंडलिकाचे गडांतर ।

निष्ठा जाणुनी केले दूर ।।३०।।

ओंकारेश्वरी फुटली नौका ।

तारी नर्मदा क्षणात एका ।।३१।।

माधवनाथा समवेत ।

केले भोजन अदृष्ट ।।३२।।

लोकमान्य त्या टिळकांना ।

प्रसाद तूचि पाठविला ।।३३।।

कवर सुताची कांदाभाकर ।

भाक्षिलीस त्या प्रेमाखातर ।।३४।।

नग्न बैसुनी गाडीत ।

लीला दाविली विपरीत ।।३५।।

बायजे चित्ती तव भक्ती ।

पुंडलीकावर विरक्त प्रीती ।।३६।।

बापुना मनी विठ्ठल भक्ती ।

स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ।।३७।।

कवठ्ठ्याच्या त्या वारकऱ्याला ।

मरीपासून वाचविला ।।३८।।

वासुदेव यति तुज भेटे ।

प्रेमाची ती खुन पटे ।।३९।।

उद्धट झाला हवालदार ।

भस्मीभूत झाले घरदार ।।४०।।

देहातांच्या नंतरही ।

किती जणा अनुभव येई ।।४१।।

पडत्या मजुरा शेलियले ।

बघती जन आश्चर्ये भले ।।४२।।

अंगावरती खांब पडे ।

स्त्री वांचे आश्चर्य घडे ।।४३।।

गजाननाच्या अद्भुत लीला ।

अनुभवा येती आज मितीला ।।४४।।

शरण जाऊनी गजानना ।

दुखं तयाते करि कथना ।।४५।।

कृपा करी तो भक्तांसी ।

धावुनी येतो वेगेसी ।।४६।।

गजाननाची बावन्नी ।

नित्य असावी ध्यानीमनी ।।४७।।

बावन्न गुरुवारा नम ।

करा पाठ बहु भक्तीने ।।४८।।

विघ्ने सारी पळती दूर ।

सर्व सुखांचा येई पूर ।।४९।।

चिंता साऱ्या दूर करी ।

संकतातुनी पार करी ।।५०।।

सदाचार रत सदभक्ता ।

फळ लाभे बघता बघता ।।५१।।

भक्त बोले जय बोला ।

गजाननाची जय बोला ।।५२।।

जय बोला हो जय बोला ।

गजाननाची जय बोला ।।५३।।

।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सद्चीदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज कि जय ।।

Gajanan Vijay

 

गजानन महाराज यांचे विजय ग्रंथ अध्यायाचे महत्व


!! गण गण गणात बोते !!

गजानन महाराज यांचे विजय ग्रंथ अध्यायाचे महत्व


Importance of Vijay Grantha Chapters



श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय वाचनाचे महत्व

जय गजानन

श्री गजाननविजय ग्रंथ हा एक सामर्थ्य शाली ग्रंथ आहेश्री गजाननाच्या 

भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्य सोडवण्याचे सामर्थ्य “ श्रीगजाननविजय 

ग्रंथ” वाचनामध्ये आहे.

संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते असा भक्तांचा 

अनुभव आहे.

एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदातरी पारायण करा विजय ग्रंथाचे.

श्रीगजाननविजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रोब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो.

श्रीगजाननविजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा हे येथे देत आहे

The Importance of Reading Individual Chapter of the Granth Shree Gajanan Vijay

Jay Gajanan!

The granth Shree Gajanan Vijay is a very powerful. The granth “Shree Gajanan Vijay” has the ability of getting rid of any kind of trouble in the life of the devotees of Shree Gajanan.

If one reads the the granth entirely then you get the desirable result immediately. This is the experience of the devotees.

At least once in a year go for darshan of Gajanan. At least once read the granth in a year.

Each chapter gives the power of sending away different kinds of problems.

We are giving the information about the situations in which to read a particular chapter.



अध्याय १ / Chapter 1

निराशामन:शांतीकर्जमुक्तीनवीन उपक्रमाची सुरुवात

Disappointment, peace of mind, freedom from debt, commencement of a new undertaking

अध्याय २ / Chapter 2

कुटुंबातील व्यथा आणि अडचणी

Sufferings and difficulties within family


अध्याय ३ / Chapter 3

दुसर्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावल्या गेले असेल तरकुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर

If one hurts someone's feelings intentionally or unintensionally, if some dear one is unwell and doctors have no hopes


अध्याय ४ / Chapter 4

जीवनातील दुख आणि समस्या कमी करण्यासाठी

To reduce sadness and problems in life


अध्याय ५ / Chapter 5

दुष्काळपाण्याची समस्यातहान लागलेली असेल व पाणि जवळ नसेल तर गेलेली संपत्ती परत येईलजीवनात सकारात्मक बदल होईल

Drought, problem in water availability, if one is thirsty and does not have water, one will get back one's lost wealth, one's life will change in a positive manner


अध्याय ६ / Chapter 6

चांगले विश्वासू मित्र मिळतीलचांगल्या वाईट मधील फरक कळेल

One will get trustworthy friends, One will understand the difference between good and evil


अध्याय ७ / Chapter 7

निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईलइच्छुकांना संतान प्राप्ती होईल

One will be rid of meaningless pride and ego, those desirous for it will get offspring


अध्याय ८ / Chapter 8

कायदे विषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेस मध्ये विजय मिळेलअहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर होईल.

Legal problems will be solved and one will be victorious in court cases, egotist people will be rid of their pride


अध्याय ९ / Chapter 9

हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होईल शत्रूंचा नाश होईलचुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईलमहाराजांचे कुठ्ल्या तरी स्वरुपात किंवा स्वप्नात दर्शन होईल जर वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल )

Influence of obstinate and stubborn friends will be reduced, the mistakes will be corrected or at least their impact will be reduced, one will get the vision of the Maharaj in some form or in one's dream (if one can not go visit Shegaon due to age of illness)


अध्याय १० / Chapter 10

आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्याची शक्तीप्रभाव कमी करण्यासाठी आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी

To minimize the power/impact of those individuals plotting against one, to get well from an illness


अध्याय ११ / Chapter 11

ध्येयप्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा ह्यासाठीस्वरक्षण होण्यासाठीअपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी

For achieving goal and to get justice for injustice done, to defend self, if one has come through accident or calamity to thank the Maharaj


अध्याय १२ / Chapter 12
आपल्या धंद्यातउद्योगातशेतीत चांगले उत्पादनधनधान्य उत्पन्न होण्यासाठीचांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी

Good produce in one's trade, industry, agriculture, to get good yield of grains and wealth, to succeed in good deed


अध्याय १३ / Chapter 13

कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठीमहापूरवादळअग्नी इत्यादि नैसर्गिक आपत्तीसंकटापासून रक्षण होण्यासाठीत्याचा प्रभाव कमी होण्यासाठी

To be free of the diseases cancer and like, to be saved from natural calamities / difficulties like deluge, tempest, fire etc, and to get reduced impact of them


अध्याय १४ / Chapter 14

अचानक सांपत्तिक आर्थिक हानी झाली असल्यासअनभिग्न संकटांपासून रक्षणा साठीनदीपाण्याच्या धोक्यापासून मुक्ती

In case of unexpected financial/economic loss, protection from unknown hazards, freedom from danger of river / water


अध्याय १५ / Chapter 15

आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी काम क्रोध मत्सर लोभ आदि पासून दूर राहण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठीप्रमोशन मिळण्यासाठीपगार वाढीसाठी असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी

To get recognition and plenty of publicity in own field of work
To keep away from lust, anger, jealousy and hatred, greed etc
To gain employment, to get promoted, to get raise in salary, for intolerant persons to become tolerant


अध्याय १६ / Chapter 16

खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अति तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास

To achieve to a grand target. If one is suffering from extreme headache


अध्याय १७ / Chapter 17

खोट्या/चुकीच्या आरोपातून मुक्तता दुसर्याकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून मुक्ती

Release from false/wrong accusation, deliverance from jealousy of others and such like perils


अध्याय १८ / Chapter 18

खोट्या आरोपातून मुक्ततातीर्थ अंगारा गेऊन ह्या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील इष्ट देवतेचे दर्शन होईल

Release from false accusations. After consuming teertha (holy water) and angara (holy ashes) if this chapter is read all the bodily diseases go away. One will get the glimpse of the favoured deity


अध्याय १९ / Chapter 19

विवाह योग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल
स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणार्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल

The boys and girls desirous of marriage will get befitting life partner
The devotees with a strong belief in their own effort and strength are not getting promoted or cannot progress will be able to progress


अध्याय २० / Chapter 20

विवाहित जीवनात सफलता मिळेलउद्योग धंद्यात झालेले नुकसान भरून निघेलप्रकृती स्वास्थ्य लाभेल

One will be have a successful married life. One will appropriately compensated for the loss sustained im business. One will enjoy a state of healthy well-being


अध्याय २१ / Chapter 21

मनःशांतीआरोग्यसुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचा आणि प्रचीती घ्या

Read for the peace on mind, health, abundant happiness and mental satisfaction and experience for yourself.


गण गण गणांत बोते

श्री गजानन महाराज


Gan Gan Ganat Bote

Shree Gajanan Maharaj