Tuesday 10 September 2019

Ameya Narvekar 45

<poem> ॥ श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरवे नम: । श्रीदत्तात्रयाय नम: । श्रीवेताळायनम: ॥ श्रीएकादशरुद्राय नम: ॥
आतां नमूं गणेशा । जो कां सर्व विद्यांचा ठसा । जयापासूनि उत्पत्ति देखा । सकळ शास्त्रांची ॥ १ ॥ तो गणराज नमीजे । त्यातें प्रकाश मागीजे । देवा तूं कृपा कीजे । मज बाळकावरी ॥ २ ॥ जयजयाजी गणराजा । सरळशुंडा चतुर्भुजा । देवी गौरीचिया सुता । नमन माझें ॥ ३ ॥ आतां वंदूं ते भवानी । जे कां अगोचर त्रिभुवनीं । ते मीं वंदिली भवानी । आदिशक्तिमाया ॥ ४ ॥ तिचे प्रसादेंकरून । मज जाहलें मतिप्रकाश गहन । आतां करीन स्तवन । श्रीवेताळाचें ॥ ५ ॥ जयजयाजी वेताळा । अष्टकोटी भूतांचिया भूपाळा । कृपा करावी स्नेहाळा । दयाळा मज रंकावरी ॥ ६ ॥ तूं जरी कृपा करसी । भक्तांचे ह्रदयीं प्रकाशसी । अनेक जातींच्या पुष्पांसी । परिमळ तूं देवा ॥ ७ ॥ देवा तुझे नमिले चरण । पवित्र जाहलें अंत:करण । परि त्वां व्हावें प्रसन्न । मज दीनासी ॥ ८ ॥ अगा देवा तुझे स्वरूपाची वर्णनकथा । पृथक् पृथक् करीन भूतगणनाथा । परि तूं क्रोधायमान सर्वथा । नसावें स्वामिया ॥ ९ ॥ यदर्थी तुझें गुणस्तवन । करावया कैचें मज ज्ञान । मी तव मूढ मती दीन । तुझें स्तवन काय जाणें ॥ १० ॥ म्हणोनि तुझें करितों स्तवन । तुवां व्हावें प्रसन्न । करावया जाण । कवित्व देवा ॥ ११ ॥ देवा जरि तूं प्रसन्न होसी । तरी पार नाहीं कवित्वासी । अमावस्येच्या दिवशीं । उचंबळ होय समुद्रासी ॥ १२ ॥ ऎकतांच तुझें महिमान । मज जाहलें मतिप्रकाश गहन । मग केलें वर्णन । तुझे स्वरुपाचे ॥ १३ ॥ एथून तव रूपाचें वर्णन । पृथक् पृथक् करीन जाण । माझें पंचमेळ प्रमाण । पुष्पा तुळें तुझे चरणीं ॥ १४ ॥ काय वर्णूं तुझे स्वरूप । सुंदर सरळ अंगोलिया देख । नखप्रभा अति सुरेख । रातोत्पळाचिया परी ॥ १५ ॥ चरणीं ब्रिदाचा तोडर । पोटरिया अति सुंदर । गुडघे मांड्या सुकुमार । शोभायमान असती ॥ १६ ॥ जानु कटी अति विशाळ । खालतें विश्व उत्पत्ति स्थळ । वरी पीतांबराचा झळाळ । अति रम्य साजिरा ॥ १७ ॥ कटीवरतें नाभीकमळ । ह्रदय जैसें गंगाजळ । कंठीं पदक मोहन माळ । अति रम्य साजिरी ॥ १८ ॥ कंठावरुतें मुखकमळ । हनुवटी अत्यंत निर्मळ । दोन्ही अधर पुढें कोमल । सुंदर प्रवाळाचिये परी ॥ १९ ॥ अधरामाजीं दंतहार तांबूल शोभे कुंकुमाकार । नेत्र जैसें अग्निचें घर । नासिकीं पवन स्थिरावला ॥ २० ॥ श्रवणीं कुंडलें सोज्वळ । नाभी चंदन परिमळ । मस्तकीं शोभे मंदिल । अति साजिरा ॥ २१ ॥ रत्नखचित शिबिका । त्यामाजीं बैससी भूतनायका । मागें पुढें कटका । दाटणी होय ॥ २२ ॥ निळ्या पताका मनोहर । गजरें चाले दळभार । मागें चालती स्वार । कोण कोणते अवधारा ॥ २३ ॥ मल्हारी अश्वावरी । भैरव तयाचिये परी । भवानी व्याघ्रावरी । चालती अति सत्वरें ॥ २४ ॥ ऎसा तूं देवाधिदेव । तुझ्या स्वारीचा मध्यरात्रीं समय । तेणें महिमंडळ । डळमळूं पाहे ॥ २५ ॥ दक्षण महिकेताळ प्रधान । वामांगीं चितळाचें वाहन । मध्यें शिबिका शोभायमान । तारांगणीं चंद्रमा जैसा ॥ २६ ॥ ऎशी महिमा अपार । मज न वर्णवे साचार । तरी कांहीं ज्ञानपदर । मज दीनातें देईजे ॥ २७ ॥ आतां पृथक पृथक् करीन स्तुती । भक्तीं ऎकावी एक चित्तीं । प्रपंचीं न घालोनि मती । यथायुक्ती परिसिजे ॥ २८ ॥ जय जयाजी वेताळा । जयजयाजी महाकाळा । जयजयाजी भूपाळा । उग्र रूपा स्वामिया ॥ २९ ॥ जयजयाजी भूतनाथा । जयजयाजी कृपावंता । जयजयाजी अनाथनाथा । भक्तकृपाळा गुणसागरा ॥ ३० ॥ जयजयाजी विशाळनयना । जयजयाजी कृपाघना । जयजयाजी अरिमर्दना । भक्तरक्षका स्वामियां ॥ ३१ ॥ जयजयाजी भूपसुंदरा । जयजयाजी मनोहरा । जयजयाजी गुणसागरा । भक्त चकोरां पावावें ॥ ३२ ॥ ऎशा करुणा वचनीं भैरवदास । प्रार्थितां पावला मज दीनास । ओतिला चैतन्यकृपेचा सौरस । सुखसंतोष पैं जाहला ॥ ३३ ॥ करोनि दुसरेपणें बोलणें । श्रोतीं असावें सावध मनें । ग्रंथाक्षरीं यथार्थ वचनें । दासाचीं परिसावी ॥ ३४ ॥ कोणासी पडलिया संकष्ट । अथवा आलिया दुष्ट अरिष्ट । तेणें तीन सप्तकें ग्रंथ पाठ । आदरें करोनि वाचावा ॥ ३५ ॥ पुत्रार्थी अथवा धनार्थी । तेणें तीन मास कराव्या तीन आवृत्ती । त्यासी कृपा करील भूपती । जाणा निर्धारी ॥ ३६ ॥ अत्यंत रोगी असेल नर । व्यथेनें पीडिला असेल फार । त्याणें सात शनिवार निरंतर । ग्रंथ आदरें वाचावा ॥ ३७ ॥ भूतपिशाश्च समंध बाधा । प्राणियासी जाहलिया आपदा । पंचसप्तकें ग्रंथ सदां । श्रवण करावा तयानें ॥ ३८ ॥ तयासी दया करील आपण । यदर्थी वहातसें आण । कारागृहींचें बंधमोचन । द्वयसप्तेकें सुटेल ॥ ३९ ॥ जी जी इच्छा करील प्राणी । ती ती पुरवील गदापाणी । यालागीं सर्वजनीं । आळस सर्वथा न करावा ॥ ४० ॥ एकचित्तें एकभावें करोनी । जो चिंतील वेताळ अंत:करणीं । त्यासी संकटीं निर्वाणीं । गदापाणी तारील हा निर्धार ॥ ४१ ॥ जो उठोनि प्रात:काळीं । नित्य स्मरेल ह्रदयकमळीं । त्याची इच्छा असेल ती सकळी । पूर्ण करील श्री वेताळ ॥ ४२ ॥ कोणासी पडलिया महासंकट । त्यानें नित्य स्मरावें श्री वेताळास । त्याचीं संकटें अरिष्टें निभ्रांत । श्री वेताळ दूर करील ॥ ४३ ॥ ज्यासी असेल भूतप्रेत पिशाचबाधा । प्राणियासी जाहलिया आपदा । त्यानें पंचसप्तकें ग्रंथसदां । आदरें करूनी वाचावा ॥ ४४ ॥ त्यासी वेताळ प्रसन्न होऊन । त्याची रोग पीडा सर्व दूर करून । त्याचीं सर्व विघ्नें निरसून । त्यास निर्वाणीं तारील ॥ ४५ ॥ युद्धाचे समय़ीं निश्चित । जो चिंतील रात्रंदिवस । त्यासी प्रसन्न होऊन युद्धास । यशप्राप्ती पावेल ॥ ४६ ॥ सुंदरी विनवी पूढती । ग्रंथ केवळ भागीरथी । श्रवणमात्रें उत्तम गतीं । प्राणीमात्रासी होय पैं ॥ ४७ ॥ हें सत्य न मानी ज्यांचे चित्त । त्यासी पीडा करील श्री भूतनाथ । यथार्थ मानोनियां सत्य । ग्रंथ आदरें वाचावा ॥ ४८ ॥ एकभावें एक मनें करुनि । जो श्रवण करील रात्रंदिनीं । त्यासी वेताळ प्रसन्न होऊनी । इच्छा त्याची पूर्ण करील ॥ ४९ ॥ तव हात जोडोनि बोले सुंदरी । आपुली पूजा कोणे प्रकारी । केसी असतां भेटी निर्धारी । होईल तुमची सांगा मज ॥ ५० ॥ तव बोले वेताळ ऎक सुंदरी । पूजा सांगतों बरव्यापरी । चित्त देईं भावें करूनी । सांगतों तें अवधारीं ॥ ५१ ॥ अबीर गुलाल सेंदूर । केळीं पोफळें नारिकेल । बदाम आक्रोड खर्जूर । सुवासिक उदबत्त्या असाव्या ॥ ५२ ॥ ऊद असावे बहुप्रकारक । पुष्पहार सुवासिक । सिद्धसामग्री करूनि आणिक । जावें समुद्रा लागोनि ॥ ५३ ॥ करोनि सचैल स्नान । ध्यावें सामग्रीशीं जाण । सांगितल्यापरी चौक भरून । बावन्नबीरांचें ध्यान कीजे ॥ ५४ ॥ चारी दिशा भाराव्या पूर्ण । आसनीं बैसावें धीट होऊन । प्रारंभ झालियापासून । कोण कोण येती ते ऎकपां ॥ ५५ ॥ मल्हारी देव अश्वावरी । भैरव तयाचिये परी । भवानी व्याघ्रावरी । धांवर येती अतिगजरें ॥ ५६ ॥ आणिक येती विक्राळ आसनीं । त्यासी भातुकें टाकोनि । ते अवघे गेलियावरी । सावधान बैसावें ॥ ५७ ॥ जेव्हा येईल वेताळाची स्वारी । वाजत गाजत हर्षभरी । जाऊनीयां तयाजवळी । धरावे चरण तयाचे ॥ ५८ ॥ ऎसी भेटी झालियावरी । प्रसन्न होईल ते अवसरीं । ऎसें कार्य झालियावरी । आसन काढावें तेथून ॥ ५९ ॥ ऎक सुंदरी ममवाणी । हें स्तोत्र जे जपती प्राणी । त्यासी मी रक्षीन रात्रंदिनिं । सत्य सत्य जाणपैं ॥ छ०॥
इति श्री वेताळ स्तोत्र समाप्त श्री वेताळार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ।


मराठी विकिस्रोत वर आलेल्या सर्व नवीन सदस्यांचे आम्ही मराठी विकिस्रोत परिवारातर्फे सहर्ष स्वागत आहे
नवीन खाते तयार करण्यासाठी इथे क्लिक करा
बंद करा (ब्राउझरमध्ये डिसमॅस एयसन कुकी काढून टाकून पुन्हा उघडा)

श्रीदत्तात्रेयकवच

Jump to navigationJump to search
(पातःस्मरणीय परमपूज्य श्रीदत्तावतार प.प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती श्रीचरणांच्या स्तोत्रादी संग्रहातील हे १४२ वे स्तोत्र आहे.)
॥ सार्थ श्रीदत्तकवच प्रारंभ ॥
श्रीपादः पातु मे पादावूरू सिद्धासनिस्थितः । पायाद्दिगंबरो गुह्य नृहरिः पातु मे कटिम् ॥१॥
श्री म्हणजे लक्ष्मी ज्यांच्या पदकमलांचा आश्रय करून राहते ते श्रीपाद श्रीदत्तात्रेय माझ्या पायांचे रक्षण करोत. सिद्धासन घालून बसलेले श्रीदत्तात्रेय माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे म्हणजे नग्न अवधूत वेष धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझे गुह्य म्हणजे विसर्जन करणारे गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करोत. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि श्रीदत्तात्रेय करोत ॥१॥
नाभिं पातु जगत्स्रष्टोदरं पातु दलोदरः । कृपालुः पातु ह्रदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥२॥
सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रूप धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या नाभीचे म्हणजे बेंबीचे रक्षण करोत. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर म्हणजे पोट असणारे (दलोदर) श्रीदत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करोत. कृपाळू म्हणजे कृपाशील श्रीदत्तात्रेय माझ्या ह्रदयाचे रक्षण करोत. सहा हात असणारे षड्भुज श्रीदत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करोत. ॥२॥
स्त्रक्कुंडी-शूल-डमरू शंख-चक्र-धरः करान् । पातु कंठं कंबुकंठंः सुमुखः पातु मे मुखम् ॥३॥
माला, कमंडलू, त्रिशूल, डमरू, शंख व चक्र यांना सहा हातांनी धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. कंबू म्हणजे शंख. शंखाप्रमाणे ज्यांचा कंठ आहे ते श्रीदत्तात्रेय माझ्या कंठाचे म्हणजे माझ्या गळ्याचे रक्षण करोत. सुंदर मुख असणारे श्रीदत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत. (या श्लोकात करान् पातु म्हणजे अनेक हातांचे रक्षण करोत असे बहुवचन घातलेले आहे. माणसाला दोनच हात असताना बहुवचन का घातले अशी शंका येते. बहुवचन घेण्यास कारण असे की आपल्या येथे पुरुषाला लग्न झाल्यावर चतुर्भुज झाला असे म्हणतात. पती व पत्नी एकरूपच असतात. तेव्हा पुरुषाला पत्नीचे दोन हात घेऊन चार हात होतात व पत्नीलाही पतीचे दोन हात घेऊन चार हात होतात. याप्रमाणे बहुवचनाची संगती लागते. 'करौ' असा पाठ मूळ प्रतीत असल्यास प्रश्नच नाही.) ॥३॥
जिह्वां मे वेदवाक्‌पातु नेत्रे मे पातु दिव्यदृक् । नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥४॥
सर्व वेद ज्या विराटस्वरूप श्रीदत्तात्रेयांचे वागिंद्रिय आहे तो माझ्या जिभेचे रक्षण करो. ज्याची दृष्टी दिव्य म्हणजे भूत, वर्तमान व भविष्य या सर्व काळातील सर्व पदार्थांना प्रत्यक्ष पाहणारी आहे असे सर्वदर्शी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत. ज्यांचे शरीर सर्वदा व स्वभावतःच सुगंधी आहे आणि जे गंधरूप आहेत असे श्रीदत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. ज्यांच्या स्वरूपाचे व गुणांचे श्रवण पुण्यकारक आहे असे श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करोत. ॥४॥
ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः । कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥५॥
(विषयात चित्त गुंतलेले असते व चित्तात विषय भरलेले असतात. मग विषयातून चित्त व चित्तातून विषय कसे काढावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला पुढे करून सनत्कुमारादी चौघा सिद्धांनी विचारला असता; माझ्या निरंतर चिंतनाने जीव मत्स्वरूप झाल्यावर चित्तातून विषय व विषयातून चित्त बाजूला होईल असे ब्रह्मदेवालासुद्धा न सुचणारे उत्तर हंसावतारात श्रीदत्तात्रेयांनी देऊन सनत्कुमारादी सिद्धांना समाधान दिले ते) हंसरूप श्रीदत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करोत. जटा धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या मस्तकावर जटा नसल्या तरी आपल्या जटाधारित्वाच्या योगाने माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. सर्वांचे ईश म्हणजे स्वामी असणारे श्रीदत्तात्रेय वाणी, जननेन्द्रिय, गुद, हात व पाय अशा पाच कर्मेंन्द्रियांचे रक्षण करोत. अज म्हणजे जन्मरहित असणारे अर्थात जन्मानंतरचेही विकार नसणारे श्रीदत्तात्रेय, डोळे, नाक, कान, जीभ व त्वगिंद्रिय (स्पर्श जाणणारे इंद्रिय) अशा पाच ज्ञानेंद्रियांचे रक्षण करोत. ॥५॥
सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् । उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥६।
सर्वांच्या आत राहणारे म्हणजेच सर्वान्तर, ज्यांच्याव्यतिरिक्त आत दुसरा कोणी नाही असे सर्वान्तर श्रीदत्तात्रेय माझ्या अंतःकरणाचे रक्षण करोत. सर्व योग्यांचा राजा श्रीदत्तात्रेय माझ्या प्राणापानादी दशवायूंचे रक्षण करोत. वरती, खाली, पाठीमागे, डाव्या-उजव्या दोन्ही बाजूला तसेच पुढच्या बाजूला श्रीदत्तात्रेय माझे रक्षण करोत. ॥६॥
अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारूपधरोऽवतु । वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥७॥
नानारूप धारण करणारे श्रीदत्तात्रेय आत बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करोत. ज्या स्थानाला कवच लागले नाहे त्या स्थानांचेही दिव्यदृष्टि असणारे श्रीदत्तात्रेय रक्षण करोत. ॥७॥
राजतः शत्रुतो हिंस्त्राद् दुष्प्रयोगादितोघतः । अधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥८॥
राजापासून, शत्रूपासून, हिंसा करणे ज्यांचा स्वभाव आहे अशा सिंहव्याघ्रादिकांपासून, जारणमारणादी दृष्ट प्रयोगापासून, अघ म्हणजे पाप त्यापासून, आधि म्हणजे मानसीव्यथा तिच्यापासून, व्याधी म्हणजे शरीरव्यथा तिच्यापासून, भय म्हणजे इतर जी भये त्यापासून व आर्ति म्हणजे पीडा तिच्यापासून श्रीदत्तात्रेय गुरु सर्वदा माझे रक्षण करोत. ॥८॥
धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किङकरान् । ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥९॥
माझ्या वित्ताचे, धान्याचे, घराचे, शेतीचे, स्त्रीचे, मुलांचे, पशूंचे, सेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसूयेच्या आनंदाला वाढविणारे श्रीदत्तात्रेय रक्षण करोत. ॥९॥
बोलोन्मत्तपिशाचाभो द्युनिट्संधिषु पातु मां । भूतभौतिकमृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥१०॥
केव्हा केव्हा लहान मुलासारखे वागणारे, केव्हा केव्हा उन्मत्त म्हणजे वेड्यासारखे वागणारे, केव्हा केव्हा पिशाच्चा सारखे दिसणारे दिगंबर व हरिरूप असे श्रीदत्तात्रेय दिवसा, रात्री व दिवसरात्रीच्या संधीत म्हणजे दिवसरात्रीच्या मधल्या वेळेत पंचमहाभूत व पंचमहाभूतांपासून झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून माझे रक्षण करोत. ॥१०॥ (आत्मा अमर आहे पण त्याने देहादिकांशी संगती केली म्हणून त्यांचे मरण मला आहे असे मनुष्य समजतो. अर्थात देहादिक मी नाही किंबहुना त्याहून मी अत्यंत वेगळा आहे असे साक्षात्काराने जाणले म्हणजे मनुष्य मृत्यु पासुन सुटतो. श्रीदत्तमहाराज माझे मृत्यु पासुन रक्षण करोत म्हणजे मला आत्मज्ञान देऊन माझ्यावर आरोपित केलेल्या देहादिकांच्या मरणापासून माझे रक्षण करोत, असा अर्थ येथे घ्यायचा आहे. पहिल्या श्लोकापासून रक्षण करोत, रक्षण करोत अशीच प्रार्थना ह्या कवचात केलेली आहे. कवच अंगात घातले म्हणजे ज्याप्रमाणे लढाईत शत्रूच्या बाणादिकांची काही पीडा न होता आपले शरीर सुरक्षित राहते; त्याचप्रमाणे हात, पाय इ. आपले अवयव वाईट, चुकीच्या कार्याकडे न वळता भजन, तीर्थयात्रादी उत्तम कार्याकडे वळणे ह्यालाच त्यांचे रक्षण करणे असे म्हटले जाते. अर्थात माझ्या इंद्रियांकडून अधःपात होणाऱ्या कोणत्याही क्रिया न होता उत्तम गतीला पोहोचविणाऱ्याच क्रिया होवोत असे मागणे ह्या कवचात देवापाशी मागितले आहे. या कवचाचा पाठ करताना हे तत्त्व लक्षात घेऊन पाठ केल्यास ऐहिक व पारमार्थिक असे दोन्ही प्रकारचे कल्याण कवच जापकाचे म्हणजे जप करणाऱ्याचे श्रीदत्तमहाराज करणार आहेत ह्यात शंका नाही. श्रीदत्तात्रेय हे सर्व देवांचे देव, ब्रह्मस्वरूप असल्याने त्यांना अशक्य काहीच नाही. मनात श्रीदत्तमहाराजांची मूर्ती आठवून हे मागणे करावे म्हणजे पुढील दोन श्लोकात सांगितलेले फळ कवच पाठकाला निश्चयाने मिळेल.)
य एतद्दत्तकवचं संनह्याद्‍भक्तिभावितः । सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥११॥
भूतप्रेतपिशाचाद्यैर्देवैरप्यपराजितः । भुक्त्वात्र दिव्यभोगान् स देहांते तत्पदं व्रजेत् ॥१२॥
हे श्रीदत्तकवच जो कोणी भक्तीने युक्त होऊन आपल्या अंगावर चढवील (येथे जो कोणी असे 'यः' या पदाने म्हटले आहे. येथे जाती पातीचा प्रश्न येत नाही. ज्याला कल्याणाची इच्छा असेल तो कोणीही या कवचजपाचा अधिकारी आहे असे स्वामीमहाराज म्हणतात.) म्हणजे जो कोणी ह्या कवचाचा जप करील वा पाठ करील तो सर्व अनर्थातून मुक्त होईल. शनीमंगळादिकांपासून होणाऱ्या ग्रहांच्या पीडेपासून मुक्त होईल. भूत, प्रेत व पिशाच्च यांचे कवचधारकापुढे काही चालणार नाही. देव सुद्धा त्याला पराजित करू शकणार नाहीत अर्थात देवांचेही त्याच्यापुढे काही चालणार नाही. इतकेच नव्हे तर या लोकात, स्वर्गात असणाऱ्या सुखांप्रमाणे त्याला सर्व सुखे प्राप्त होतील. दुःख तर मुळीच होणार नाही व या लोकातील आयुमर्यादा संपल्यावर म्हणजेच देहान्ती, कवच जापक श्रीदत्तस्वरूपाला प्राप्त होईल. याहून जास्त काय मागावे व याहून जास्त मागणे तरी काय असणार?
॥श्रीदत्तकवच सार्थ संपूर्ण झाले ॥
- अनुवादक -
कै. ब्रह्मश्री पंडित आत्मारामशास्त्री जेरे




मराठी वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय !
बंद करा (ब्राउझरमध्ये डिसमॅस एयसन कुकी काढून टाकून पुन्हा उघडा)

जोगेश्वरी महात्म्य

Jump to navigationJump to search
<poem> सांगते जोगेश्‍वरीचे महात्म्य महान । सकल सुखाचे निधान ।
करावे अनुदिन त्याचे पठन । एक चित्ते वा करावे श्रवण ॥४९॥
जो करील असे पठन । देईल माता एक दिन त्यास दर्शन ।
पुत्र पौत्र तेजस्वी संतान । न संपेल कधी त्याचे धन ॥५०॥
जोगेश्‍वरीची प्रतिमा ज्याचे घरी । धन्य धन्य तो प्राणी संसारी ।
तयाच्या पुण्या नाही सरी । मातेस करावे नमन ॥५१॥
रोज जो जोगेश्‍वरीस नमस्कारी । त्यासी देखोनी मृत्यू पळे दूरी ।
संकटे होती घाबरी । पाहूनि भक्‍तासी त्या ॥५२॥
जे जोगेश्‍वरी मातेस पूजीती । त्यांची राहे निर्मळ मती ।
लाभती त्यास सार्‍या शक्‍ति । सत्य हे जाणावे ॥५३॥
नित्य करावे जोगेश्‍वरी पूजन । होईल आयुष्य सुखी संपन्न ।
दर्शने वाटते धन्य धन्य । आयुष्याचे हो सार्थक ॥५४॥
जोगेश्‍वरीचा वाचती जे पाठ । सुखाने भर जीवन काठोकाठ ।
रोग, मृत्यु दाविती पाठ । त्या जीवास दुःख कुठले ? ॥५५॥
जे ऐकती जोगेश्‍वरीचे महिमान । त्यांचे पाशी सुखाचे अक्षयी निधान ।
संकटे होती हैराण । जोगेश्‍वरी माता महान ॥५६॥
जे जोगेश्‍वरीची करिती आरती । तया घरची न सरे संपत्ती ।
न ये त्यांचेवरी आपत्ती । महीमा असे मातेचा ॥५७॥
जे जोगेश्‍वरीस विनवीती । मनो भावे अति सेवा करिती ।
प्रतिमे जवळ बसोनि प्रार्थिती । ते प्रिय होती देवीस ॥५८॥
जे जोगेश्‍वरीची निंदा करिती । भ्रमिष्ट हो त्यांची जाणा मती ।
मृत्युस ते सवे बोलाविती । जाणा हे त्रिवार सत्य ॥५९॥
श्रध्दा ठेवूनि देवीवरी सत्य । जी जोगेश्‍वरीस भजते नित्य ।
तिचे होईल सुंदर, बुध्दिवान अपत्य । भाग्यवती ती खरी ॥६०॥
ज्या नारी जोगेश्‍वरी पूजन करिती । त्या सदा सौभाग्यवती होती ।
मिळे पुत्र, पौत्र संपत्ती । जोगेश्‍वरी दर्शने ॥६१॥
जी नारी भाव धरोनी प्रातःकाळी । जोगेश्‍वरीस वाहे फूल वा पाकळी ।
ती भाग्यवती हो आगळी । श्रध्दा ठेवा अंतरी ॥६२॥
ज्या जोगेश्‍वरी पूजा चुकती । पुढील जन्मी सौभाग्य न पावती ।
नर्काकडे जाई त्यांची गती । कटु सत्य हे जाणा ॥६३॥
भावे जोगेश्‍वरी प्रदक्षिणा करिती । ते देवीचे आवडते भक्‍त निश्‍चीती ।
निर्मल सदा राहे त्यांची मती । धन्य धन्य ते भक्‍त ॥६४॥
जोगेश्‍वरी पूजन ज्या नारी करिती । चिरंजीव तयांची हो संतती ।
अखंड सौभाग्य तयासी । सत्य हे जाणा ॥६५॥
जे करीती जोगेश्‍वरी भक्‍ती । तयासी नाही जन्म मरण अंती ।
राहती मातेच्या नित्य चरणी । चिरंजीव ते जाणावे ॥६६॥
जोगेश्‍वरी मंदिर माहेर । माऊली जोगेश्‍वरी थोर ।
सांभाळी मायेने हळुवार । महिमा तिचा महान ॥६७॥
जे प्राणी घालिती जोगेश्‍वरीस दंडवत । शांती नांदे त्यांचे सदैव घरात ।
श्रध्दा पाहिजे मात्र ह्रुदयात । ना संशय ठेवा मनी ॥६८॥
उणे बोले जो जोगेश्‍वरीस । त्याचा करी ती निर्वंश ।
नर्कात त्याचा असे प्रवेश । कठोर हे तत्व जाणा ॥६९॥
जोगेश्‍वरी नाव उच्चारीती निशीदिनी । त्यास मिळती सौख्य शांतीच्या खाणी ।
तारीते संकटातूनि जोगेश्‍वरी जननी । कृपाळू माता अशी ॥७०॥ स्त्री पुरुष दोघे जण । करिती जोगेश्‍वरीचे पूजन ।
त्यांचे जाई वांझ पण । हे जाणावे सत्य ॥७१॥
त्रैलोक्य असे जोगेश्‍वरीजवळ । तीर्थांचे पावन जळ सकळ ।
पूजा मातेस ठेऊनि मन निर्मळ । भाग्यासी नाही उणे ॥७२॥
जोगेश्‍वरी निर्गुण निराकार । तिला नसे आकार ।
पण जाहली साकार मंदिरी । भक्‍ता साठी पुण्यनगरी ॥७३॥
जैसी वैशाखात साऊली । तैसी असे जोगेश्‍वरी माऊली ।
उध्दरला तो प्राणी ज्यास पावली । सत्य हे जाणा ॥७४॥
कल्पतरुची छाया जोगेश्‍वरी । जाणते भक्‍ताची इच्छा अंतरी ।
जणू माता भेटे सासरी । प्रेम तसे तिचे ॥७५॥
स्मरण मातेचे सदा करावे । अखंड नाम जपत जावे ।
जोगेश्‍वरी स्मरणे पावावे । मनी समाधान ॥७६॥
सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंद रुप असता ।
जोगेश्‍वरी स्मरणा विण सर्वथा । भक्‍तानी राहूच नये ॥७७॥
संपत्ती अथवा येता विपत्ती । जैसी येईल काळगती ।
जोगेश्‍वरी नामस्मरणाची स्थिती । सांडूच नये कदापि ॥७८॥
वैभव सामर्थ्य आणि सत्ता । उत्कट भाग्य अति भोगिता ।
जोगेश्‍वरी नामे संकटे नासती । जोगेश्‍वरी नामे विघ्ने निवारती ।
महापापी उध्दरती । नामाचा महिमा असे मोठा ॥८०॥
सर्वास जोगेश्‍वरी नामाचा अधिकार । जोगेश्‍वरी नामी नाही लहान थोर ।
जोगेश्‍वरी नामे बहुत जनाचा उध्दार । जोगेश्‍वरी विना काही नाही ॥८१॥
जोगेश्‍वरी ही अक्षरे चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी ।
तो परम पावन संसारी । होऊनि इतराते तारी ॥८२॥
बाळपणी तरुणकाळी । कठीण काळी वृध्दापकाळी । सर्वकाळी अंतकाळी ।
नामस्मरण जोगेश्‍वरीचे असावे ॥८३॥
जोगेश्‍वरी नामे अनेक भक्‍त तरले । नाना अपघातापासून सुटले ।
संकटातून कित्येक वाचले । जोगेश्‍वरी नामे झाले पावन ॥८४॥
जोगेश्‍वरी मातेसी ओळखावे । जीवन सार्थकाचि करावे ।
दुःख दुसर्‍याचे जाणावे । परपीडेवर नसावे अंतःकरण ॥८५॥
असे ऐसे जोगेश्‍वरी महात्म्य महान । करी सावित्री समग्र ते निरुपण ।
म्हणे होते सार्थक पूर्ण जीवन । करिता श्रध्देने याचे पठण ॥८६॥
माता जोगेश्‍वरी असे थोर । सांभाळ करी तुमचा हळुवार ।
घ्या वसा तिचा तुम्ही वर्षभर । व्हाल दुःखातून अहो पार ॥८७॥
घेतला वसा टाकू नये । गर्व कोणता करु नये ।
चांगले कृत्य सोडू नये । सुख दुःख समान मानावे ॥८८॥
पहाटे करुनि स्नान, व्हावे पवित्र । पूजावी जोगेश्‍वरी समोर ठेऊनि चित्र ।
विसरावे सारे गात्र अन्‌ गात्र । उपवास करावा दिनभरी ॥८९॥
वहावीत एक्याऐंशी फुले प्रतिमेवरी । "श्री जोगेश्‍वरी भगवती" मंत्र हा नवाक्षरी ।
म्हणूनि श्रध्देने स्मरावी जोगेश्‍वरी । पाठ वाचावा भाव ठेऊनि अंतरी ॥९०॥
व्रत हे श्रध्देने वर्षभरी करावे । उद्यापनी सवाष्णीस जेऊ घालावे ।
गरीबास यथाशक्‍ति दान वाटावे । बांगडया बारा अन्‌ सवाष्णीस ॥९१॥
केल्याने हे जोगेश्‍वरी मातेचे व्रत । प्रसन्न होईल प्राचीन ग्रामदैवत ।
पूर्ण करील तुमचे सकल मनोरथ । बाधतील ना संकटे व्यथा ॥९२॥
ऐकूनि हे सर्व ऐश्‍वर्याने आचरिले व्रत । वर्षभरी करी सारे श्रध्देने नियमीत ।
तो काय घडला चमत्कार नाही सांगत असत्य । पति तिचा प्रकटला हो पुन्हा जिवंत ॥९३॥
वेड कन्येचे हळूहळू विरत जाई । आले परत परदेशातून पुत्र, जावई ।
न्हावू लागली ऐश्‍वर्या पुन्हा वैभवी । जोगेश्‍वरी मातेची होता कृपा तिचेवरी ॥९४॥
हा पाठ करिता श्रवण पठन । सकळ संकटे जाती निरसून ।
दुःख दारिद्रय अति भीषण । न ये कधी भक्‍तावरी ॥९५॥
करा जोगेश्‍वरी प्रतिमेस पूजन । नेईल माता भव सागर तरुन ।
आनंदाने बहरेल सारे जीवन । श्रध्दा पाहिजे मात्र अंतरी ॥९६॥
पूजा श्री जोगेश्‍वरी माता नित्य । नका होऊ कधी भय क्रान्त ।
सरेल जीवनातील भ्रान्त । भक्‍तांची कैवारी माता ॥९७॥
नका होऊ मनी हिंपूटी । घाला मातेच्या चरणास मिठी ॥
वाचविल तीच तुम्हास संकटी । आदि माया जोगेश्‍वरी ॥९८॥
जोगेश्‍वरी माता सौभाग्य दायिनी । वर दायिनी कनवाळू जननी ।
सामर्थ्य महान तिच्या असे स्तवनी । मुक्‍त व्हाल दुःखातूनि ॥९९॥
जोगेश्‍वरीने विश्‍व सारे कोंदले । मूल तत्व हे ज्यानी जाणिले ।
जीवन त्याना कळले । ब्रह्मांडाचे रहस्य उलगडले ॥१००॥
जीवन-वैभव सारे क्षण भंगुर । भासे सत्य, परि असे नश्‍वर ।
श्री जोगेश्‍वरीचा एकच आधार, तत्त्व हे ठसवा अंतरी ॥१०१॥
<poem>
PD-icon.svgहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.Flag of India.svg




मराठी विकिस्रोतवर आपले स्वागत आहे
बंद करा (ब्राउझरमध्ये डिसमॅस एयसन कुकी काढून टाकून पुन्हा उघडा)

अक्कलकोट स्वामी स्तोत्र

Jump to navigationJump to search
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |

ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||

नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||

नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||

थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||

श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||

नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||

त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||

म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||

कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||

एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||

मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||

खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||

दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||

नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||

दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||

यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||

काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||

पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||

तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||

अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||

नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||

स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||

ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||

सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||

स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||

जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||

कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||

ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||

अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||

सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||

न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||

दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||

स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||

मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||

ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||

तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९

संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||

तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||

अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||

स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||

पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||

भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||

स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||

बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||

जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||

पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||

शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||

बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न || ५२ ||

वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||

ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||

बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||

गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||

चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला | अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें || ५७ ||

अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||

याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले | म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||

नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी | स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||

जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था | सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||

अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||

व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३ ||

सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||

सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी || ६५ ||

तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे || ६६ ||

तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य | म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना || ६७ ||

मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||

वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा | वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||

शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी | शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||

स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल || ७१ ||

माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||

एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||

या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )

|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||

<poem>
PD-icon.svgहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.Flag of India.svg

विकिस्रोत

इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.


मराठी विकिस्रोतवर आपले स्वागत आहे
बंद करा (ब्राउझरमध्ये डिसमॅस एयसन कुकी काढून टाकून पुन्हा उघडा)

श्रीनग्नभैरवराज स्तोत्र

Jump to navigationJump to search
॥ ॐ ॐ ॐ॥ ॥ श्रीभूस्वानंदाधिशोमयुरेश्वरोविजयते॥
॥अथ श्रीनग्नभैरवराज-स्तोत्र॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीनग्नभैरवराजाय नम:॥ (श्लोक अनु.)।
श्रीनग्नभैरव देवा, नमस्कार असो तुला। कृपा करूनि रक्षावा, दयाळा दास आपुला ॥1॥ प्रचंड भीमरूपा हे भैरवा परमेश्वरा। सुटतो ऎकूनी कंप, त्वदरवा करमेश्वरां ॥2॥ वज्रदेहा कृपासिंधो, अधर्मिष्ठा भयप्रदा। धर्मिष्ठा रक्षिसीं प्रेमें वारूनी सर्व आपदा ॥3॥ गाणेशांचा प्राणसखा, एकला तूंचि बा खरा।रक्षिसी पुढतीं मागें, मायसा स्वीय लेकरां ॥4॥ श्रीभूस्वानंद सत्क्षेत्रीं, मुख्याधिष्ठान शोभलें। परंतु गाणपत्यार्थ चित्त सर्वत्र लोभलें ॥5॥ सप्रेमें नाचसी देवा। गणेशानाग्रिं जेधवां। देहभान न तें राहे, मोद हा वाढतो नवा ॥6॥ अट्टाहासरवे देवां, दानवा कांपरे भरे। नग्नभैरव हे कानीं, ऎकतां धृति ना उरे ॥7॥ सर्वमायाविहिना हे, सर्व-मायाप्रचालका। सर्वांतर्यामिगा देवा, रक्षिं या दीनबालका ॥8॥ भुक्तिमुक्तिप्रदा स्वामिन, धन्यधान्यविवर्धना। योगींद्रपाला नमितों पाव रे दुष्टमर्दना ॥9॥ त्वदभीतीने विश्व सारें भयभीतचि वर्ततें। त्वत्पादनिष्ठ गणती भवसिंधूसि गर्त ते ॥10॥ कृपाळा भैरवा पाव, नाव आम्हांसि या भवीं। तुझी कृपा एक मात्र, आम्हां दीनां सदा हवी ॥11॥ स्तविती स्तोत्रराजे या, जे तुला करूणाघना। तयातें लेश ना होती भैरवेश्वर यातना ॥12॥ अनुष्टुप वृत्तिं पहिले रत्न श्रीनग्नभैरवा। अर्पी अंकुशधारी हा, करूनी करुणा - रवा ॥13॥ जय जय गणराज समर्थ॥ इति श्रीनग्नभैरवराजार्पणमस्तु॥ श्रीस्वानंदेशार्पणमस्तु॥
वरील स्तोत्राशिवाय आणखी एक स्तोत्र खालीलप्रमाणे आहे.
॥ सकलभयहर श्रीनग्नभैरवराजनमस्कारस्तोत्र ॥ (भुजंगप्रयात श्लोक) मयुरेश्वराचा महाभक्तराज। महासिद्धिसुनु प्रतापी विराज॥ पहा शूलधारी महामुक्तकेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥1॥ निजानंदलोकीं गणेशासमोर। पहा बालरूपी स्वमायाकुमार॥ करीं नृत्य मोदें हरी भक्तपाशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥2॥ महाव्यक्तसत्ता मुदानंदधारा। गळे व्यक्तरूपें गमें सौख्यसारा॥ जनान्त:स्वरूपे धरी भीमवेषा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥3॥ सुरक्तांग सिंदूरगंधानुलिप्त। कटी वज्रकौपीन-संबद्धहस्त॥ असे भीतिहारी सदा ढुंढिदासां। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥4॥ महामंडपीं देउळीं मायुरांत। सदा रक्षणी क्षेत्रगांच्या रहात॥ महागाणपत्यांविषीं प्रीत ऐशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥5॥ करी फार लीला हरी सर्व बाधा। वळे गाणपां भक्तिभावें न साधा॥ अनन्या जनां रक्षितो त्या परेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥6॥ अगाणेशभावें जधीं त्रस्त झाला। महाराज देवा शरण्यार्थ आला। तदा भिल्लवेषा धरी आधिनाशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥7॥ जसा ये उमाठ्यावरी अंशुमाळी। तशी दिव्यतेजोज्वळी मूर्ती आली॥ पहा भैरवाची तदा विघ्ननाशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥8॥ दिसे वामहस्तीं धनुष्य प्रयुक्त। तयें दक्षिणें बाण तीक्ष्ण प्रभात॥ कटीं खड्गधेन्वाख्य शस्त्रेच ऐशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥9॥ जटाजूट मौळीं चलदभृंग कृष्ण। सुवेणी-कृत श्यामलांग प्रभीष्ण॥ जपापुष्प-रक्तांबरे भूषिलासा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥10॥ त्रिनेत्र प्रभु सोमभाले विशालें। महारक्तशा इक्षणें भीत काळे॥ पळावें अशा आदरीं भव्यवेषा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥11॥ पहा कुंडलें कानीं शंखाकृतींचीं। गळीं मोतियांच्या प्रभा मालिकांची॥ पहा सुंदरा वीरभावा गुणेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥12॥ सुफुल्लांबुजासारिखें दिव्य वक्त्र। महापूर्णिमाचंद्रसें ब्रम्हसूत्र॥ दिसे मोरपिच्छीं जटा शोभिताशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥13॥ महा कर्मठीं प्रेरिला आभिचारीं। नृपा गाणपा मारण्या हस्ती भारी॥ तया वारणा वारण्या सिद्धवेषा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥14॥ अशा भिल्लवेषें करी सज्ज चाप। शरा योजिलें पाहुनि लक्ष ताप॥ प्रतापी गजा संस्थिता पांच कोसा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥15॥ धरी धान्य सिहास्य-विघ्नेंश्वराचे। जपीं अस्त्र सिंहास्यमंत्रे तयाचें॥ अशा उज्वला चापधारी परेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥16॥ टणत्कारिता चाप तो बाण वेगें। झणत्कार शब्दें निघालाच रागें॥ गमे सर्पराजी महापक्षिराट्सा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥17॥ दिशो व्याप्त तेजें मही धुंद झाली। सुरीं इश्वरीं भीती मोठी उडाली॥ राजा लक्षुनि बाण गेलाच ऐशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥18॥ गजा वारिले हारिले सर्व शत्रू। अगाणेश जे पीडिती ढौंढ पात्रू॥ महानंद झाला तसा गाणपेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥19॥ मयुरेश्वरा वंदिलें भिल्लवेषें। तदा भैरवें नग्नसंज्ञें सुहर्षे॥ तये गौरवीला निजानंदतोषा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥20॥ असें रूप ध्यानीं धरूनी भजावें। प्रभूभैरवा आपदासीं त्यजावें॥ दिला विघ्नपें भैरवा मान ऐसा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥21॥ नसे मयिका लेश ठावा गुणांना। तरी नग्नसंज्ञा तयासी म्हणाना॥ चिदानंद-सत्यार्थभावा गुणेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥22॥ (स्त्रग्धरा) नमस्कारस्तोत्र प्रकटमहिमा वीर गरिमा। मनी ध्यातां गातां सतत भयकालीं च परमा॥ तरी मयुरेश्वरप्रभु-सुत अशा भैरववरा। कृपा येई वारीं सकलभयविघ्नादिक दरा॥23॥ (अनु.) श्रीनग्नभैरवेंद्रांचें नमस्कार प्रभावद। स्तोत्र मी बालहेरंबे गाइलें शुद्ध सत्पद॥24॥ ध्यानीं धरुनि तद्रूपा ममाखिलभया पहा। अर्पिलें श्रीमयुरेशपालका मोद दे महा॥25॥ श्रीमद् गणेशार्पणमस्तु। श्रीमन्नग्नभैरवराजार्पणमस्तु॥
ही दोन्ही स्तोत्रे आद्यगाणपत्यपीठ श्रीक्षेत्र मोरगाव, जि. पुणे येथील मंदिरात लावलेली आहेत. श्री अंकुशधारी महाराज व श्री हेरंबराज या गेल्या शतकातील श्रेष्ठ गणेशाचार्यांनी ती लिहिली आहेत. अधिकमाहिती श्रीक्षेत्र मोरगाव येथील श्रीयोगिन्द्र मठातून मिळू शकेल.

No comments:

Post a Comment

Ameya jaywant narvekar